नांदेड। राजर्षी शाहू विद्यालय मुदखेड येथील विद्यार्थी नागेश नारायण लुटे यांनी जिल्हास्तरीय शालेय अथलेटिक्स क्रिडा स्पर्धा 22_ 23मध्ये 14 वर्षे वयोगटाखालील 600 मीटर धावणे स्पर्धेत जिल्ह्यातून दुसरा क्रमांक आला आहे, या यशाबद्दल लुटे यांच्ये अभिनंदन होत आहे.
नांदेड येथे 17 ते 18 डिसेंबर रोजी सायन्स महाविद्यालय येथे जिल्हा स्तरीय शालेय अथलेटीक्स क्रिडा स्पर्धा आयोजन करण्यात आले होते, यात नागेश लुटे यांनी 600 मिटर धावणे यात जिल्हातुन दुसरा क्रंमाक मिळविला असुन या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रल्हादराव सरसे पाटील तसेच मुख्य कार्य अधिकारी एस.एम. साखरे तसेच उपाध्यक्षा शांता सरसे.
प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका पवळे तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अजय सरसे तथा सचिव क्रीडा शिक्षक आर.एल.बुद्धेवाड तसेच पुयड पी. टी. विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच वडिलांचे पालक नारायण लुटे पाटील यांनी सदरील विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.