उस्माननगर ( माणिक भिसे ) नांदेड जिल्ह्यात वीजेचा कडकडाट व मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. कंधार तालुक्यातील सावळेश्वर येथे वीज कोसळून एक तरुण शेतकरी ठार झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजता घडली.


घटनेचे वृत्त समजताच आ.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. मयताच्या नातेवाईकांचे सांत्वन केले. कंधार तालुक्यातील सावळेश्वर येथील तरुण शेतकरी पांडुरंग निवृत्ती कदम वय ४७ वर्षे हा शेताकडे गेला होता. सायंकाळी विजेच्या कडकडाटसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. शेतातून घरी येत असताना गावाजवळील डांबरी रस्त्यावर पांडुरंग कदम यांच्या अंगावर वीज कोसळली ते जागीच ठार झाले.


कंधार विधानसभा मतदारसंघाचे आ.प्रतापराव पाटील चिखलीकर हे पुरग्रस्त भागाचा दौरा आटोपून चिखली येथील आपल्या मळ्यात दाखल झाले होते. घटनास्थळ त्यांच्या मळ्यापासून हाकेच्या अंतरावर असल्याने ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पांडुरंग कदम हा जागीच ठार झाले होते. सावळेश्वर येथील मयताच्या निवासस्थानी जाऊन नातेवाईकांचे सांत्वन करुन कदम कुटूंबियांना धीर दिला.




