कंधार तालुक्यात ६० हजार तर लोहा तालुक्यात ६५ हजार हेक्टर क्षेत्र बाधित
पंचनामे करण्यासाठी ३२०हुन अधिक कर्मचारी
लोहा-१२० तर कंधार मध्ये १७१ जनावरे दगावली


लोहा| लोहा -कंधार तालुक्यात दोन दिवस (२८ व २९ ) झालेली अतिवृष्टी व त्यानंतर आलेल्या महापुरामुळे यानेक गावांना फटाका बसला. काही ठिकाणी तलाव फुटलती. शेतीपिकांचे नुकसान तर झालेच पण रहिवाशी भागात अभूतपूर्व विदारक परिस्थिती उदभवली,असा नैसर्गिक आपत्ती काळात कंधार उपविभागीय अधिकारी तहसीलदार रामेश्वर गोरे लोहा तहसीलदार ,विठ्ठल परळीकर ,लोहा मुख्याधिकारी श्रीकांत गोरे, कंधार मुख्याधिकारी,डीवायएसपी अश्विनी जगताप ,तसेच त्यांच्या टीमने दाखविलेली तत्परता अनेकांना जीवदान देणारे ठरले. मध्यरात्री पुरग्रस्त गावात जाऊन रेस्क्यू ऑपरेशन करत अनेकांचे प्राण वाचविले. स्थलांतर आणि पुरग्रस्त भागात तातडीची भोजन व्यवस्था केली आई उघडीप होताच तात्काळ पंचनामे सुरू केले आहेत. प्रशासन सतर्क राहिल्यामुळे आपतिग्रस्त भागात मोठी मदत झाली आणि जनरोष उफाळून आला नाही. सर्व विभागात समन्वय होता. या अधिकाऱ्यांच्या कामाची आ. प्रतापराव पाटील यांनी ही नोंद घेतली व शाब्बासाकीची थाप दिली.


लोहा- कंधार तालुक्यातील १३ मंडळात अतिवृष्टीची झाली. २९ तारखेला झालेल्या पावसाने हाहाकार उडविला. मानकोळी मंडळात तब्बल 284 मिमी इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली . २९ तारखेला भल्या पहाटे दोन वाजता प्रभारी उपविभागीय अधिकारी कंधार तहसीलदार रामेश्वर गोरे हे दुथडी वाहणाऱ्या मान्यड काठच्या घोडज गावात गेले पुरातून १५ कुटूंबातील ६० व्यक्तीना रेस्क्यूद्वारा बाहेर काढले व तेवढ्या रात्री सुरक्षित ठिकाणी पोहचविले.


दोन दिवस झालेल्या पावसाने पुरस्थिती निर्माण झाली शिवाय मान्यड नदी पात्रात लिंबोटी धरणातून विसर्ग, पावसाची संततधार ,त्यामुळे अनेक भागात परिस्थिती विधारक होती. घोडज, भुकमारी गावात रेस्क्यू केले लोकांना जीवदान मिळाले. ६० हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवक असे १७६ कर्मचारी गावोगावी जाऊन पंचनामे करत आहेत३७३ जणांना तात्पुरते स्थलांतर केले. आता पर्यंत १७१ जनावरे दगावण्याची नोंद झाली आहे १८ घरे पडली.या नैसर्गिक आपाती काळात प्रभारी उपविभागीय अधिकारी तहसीलदार रामेश्वर गोरे व टीमने अतिशय तळमळीने कर्तव्य बजावले..लोहयात पूरपरिस्थिती पाहण्यासाठी सकाळी सात वाजण्याच्या आगोदर आले लोकाना भेटले धीर दिला व प्रशासनाला सूचना दिल्या.


लोहा तालुक्यातील सहा मंडळात अतिवृष्टी झाली. २९ रोजी झालेल्या मुसळधार पावसात माळाकोळी मंडळात विक्रमी पावसाची नोंद झाली २८४ मिमी इतका पाऊस झाला. तालुक्यात ६० हजार हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले आहे., सुगाव, उमरा, धमन खु, वाळकी खु, पळशी, भेडेगाव, शिवाणी जमगा, लोहा शहर या गावांना पुराचा वेडा पडला.दोन दिवसापासून तालुक्यात पावसाचा जोर होता.पण २९ ऑगस्ट रोजी लोहयात पुराचा हाहाकार झाला. तहसीलदार विठ्ठल परळीकर यांच्या पायावर शस्त्रक्रिया झालेली असतानाही त्यांनी’ नैसर्गिक आपती प्रसंगावर मात करत तालुक्यात कुठेही जीवितहानी होऊ नये यासाठी कसोशीने प्रयन केले. धनज उमरा, लोहा येथे २०० जणांना रेस्क्यू’ द्वारे सुरळीत स्थळी नेले. नुकसानीचे १४० कर्मचारी पंचनामे करत आहेत. आतापर्यंत ५६ जनावरे दगावण्याची नोंद झाली आहे. ४०९ हुन अधिक जणांना त्या दोन दिवसात स्थलांतरीत करत त्यांची भोजन व निवास व्यवस्था केली. तहसीलदार परळीकर व टीम च्या . तत्परतेमुळे अनेक पुरग्रस्त गाव व अनेक कुटुंबाना’ आधार मिळाला.
लोहा शहरात अभूतपूर्व पुरपरिस्थिती उद्भवली
मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे यांनी अतिशय कुशलतेने परिस्थितीवर मात केली. जुन्या शहरातील कलालपेठ साठे गल्ली, विस्तारित पवार गल्ली, गोल्डनसिटी, सिद्धार्थ नगर , जायकवाडी कॅम्प , इंदिरानगर पवार हॉस्पिटल भाग, स्मशानभूमीचा भाग, या परिसरात जाऊन त्यांनी नागरिकांना धीर दिला. जेवनाची सोय केली सिद्धार्थनगरात तात्पुरते स्थलांतर केले . त्यांना शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची साथ मिळाली.. तात्काळ चुकसानग्रस्त भागात पंचनामे सुरु झाले.नगरपालिका कर्मचाऱ्यांचे टीम वर्क दिसले.मुख्याधिकारी लाळगे यांच्यामुळे जनरोष कमी झाला दोन्ही तालुक्याचे प्रभारी उपविभागीय अधिकारी तहसीलदार रामेश्वर गोरे, डीवायएसपी डॉ अश्विनी जगताप, तहसीलदार विठ्ठल परळीकर मुख्याधिकारी लाळगे, कंधार मुख्याधिकारी , पोलीस निरीक्षक आयलाने , सोनखेड कंधार, माळाकोळी, उस्माननगर पोलीस ठाणे ,वीज वितरण यासह सर्व विभागात समन्वय होता .खासदार डॉ काळगे, आ. बोंढारकर आ. राठोड, यांच्याशी प्रशासनाने समन्वय ठेवत’ लोकां पर्यंत मद कार्य पोहचविले .या अधिकाऱ्यांच्या सोबत आमदार चिखलीकर खंबीरपणे उभे होते. श्री गोरे, श्री परळीकर, श्री लाळगे, व टीमने अतिवृष्टीकाळात अतिशय चांगले काम।केले आहे त्यामुळे जनतेचा रोष कमी झालेला दिसला.
अँबुलन्स पंक्चर पण एसडीएमची गाडी मदतीला
२९ रोजी अति मुसळधार पाऊस वेळ रात्रीची होती . भूकमारी येथील एका गरोदर महिलेला प्रसुती साठी दवाखान्यात नेताना ‘ अंग्बुलन्स पंक्चर झाली संततधार पाऊस वरून पडत होता. त्यावेळी रात्री तहसीलदार तथा प्रभारी एसडीएम श्री गोरे हे पुराने वेढा टाकलेल्या भूकमारी गावात जात होते. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या वाहनातून त्या गरोदर मातेस रुग्णालयात पोहचविले आणि सुरळीत प्रसूती पार पडली.


