नवीन नांदेड। भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त आस्क पब्लिक स्कूल धनेगाव येथे शाळेत ध्वाजाहारोहण डॉ.प्रकाश शिंदे ग्रामपंचायत सदस्य धनेगाव मुझामपेठ यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी देशभक्ती गीतावर नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.


१५आगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिना निमित्त शाळेत डॉ.प्रकाश शिंदे ( ग्रामपंचायत सदस्य) धनेगाव मुझामपेठ यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती विजय शिंदे माजी सरपंच धनेगाव तर कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी म्हणून बालाजी कोत्तावार (बारको सेवाभावी ट्रस्ट सहसचिव), डॉ. अरुण निंबाळकर सेवा रुग्णालय, बीबी चौधरी , दिलीप गजभारे माजी सरपंच धनेगाव यांच्या सह मान्यवरांच्यी उपस्थिती होती.


उपस्थित मान्यवरांच्या सत्कार संस्थेचे संचालक कोत्तावारसंतोष तसेच कोत्तावर श्रीकांत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित पाहुण्यांनी शाळेच्यी प्रगती झाल्याचे सांगुन विविध उपक्रम राबवले जात असल्याचे सांगितले. शिक्षिका ज्योती यांच्या हस्ते विजयी स्पर्धाकांना पारितोषिक देण्यात आले.


कार्यक्रमाचे मार्गदर्शन अनुष्का कोत्तावार. कार्यक्रमा च्या आयोजक प्राचार्य ज्योती कोंडलवार, तर सूत्रसंचालन शारदा सुरन, यांनी तर रांगोळी डेकोरेशन अनुराधा जाधव,अस्मिता हनवते,नृत्य व थीम प्रिपेअर आरती गजभारे, बलून डेकोरेशन हिना शिक्षिका ,अर्चना शारदा सुरनर, अनिता हिवराळे,सपना पुयड, सेवा ज्योती जाधव यांनी सहकार्य केलेल्या सर्व शिक्षिका यांच्या आभार मानले तर अनुष्का कोत्तावार हस्ते बक्षीस देऊन यांना प्रोत्साहीत करण्यात आले,आभार प्रदर्शन संस्थेचे संचालक संतोष कोत्तावार यांनी मानले.



