नांदेड| 25 रोजी गोदावरी नदी वरील प्रकल्पाचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू असल्या कारणाने नदीला महापूर आला आहे व विष्णूपुरी प्रकल्पाचे 16 दरवाजे उघडल्यामुळे व सकाळपासूनच पाऊस संततधार चालू असल्याकारणाने नांदेड शहरातील सखल भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले यामध्ये श्रावस्ती नगर व समीराबाग येथील नगरामध्ये 12 ते 15 फूटा पर्यंत पाणी विसर्ग होत होते येथील नागरिकांमध्ये पाण्याच्या प्रवाहामुळे भीती निर्माण झाली होती.


येथील नागरिकांनी अग्निशमन विभाग नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका यांना ही माहिती दिली सदरील ठिकाणी अग्निशमन विभागाची एक रेस्क्यू टीम रबर बोट आउट बोट मशीन सहित श्रावस्ती नगर कडे रवाना झाली. ऊक्त ठिकाणी पाण्याचा प्रवाह जोरात असल्याकारणाने रबरी बोट आउट बोट मशीन सहित पाण्यात उतरवण्यात आली व श्रावस्ती नगर येथील 15 जणांना पाण्यातील प्रवाहापासून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. येथील सर्व लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवल्यानंतर लागलीच समीराभाग खडकपुरा कडे ही रेस्क्यू टीम रवाना झाली समीराभाग मधील पाण्याच्या प्रवाहात अडकलेल्या सहा (06) लोकांना सुरक्षित ठिकाणी बाहेर काढण्यात आले.


श्रावस्ती नगर मधील रेस्क्यू केलेल्या लोकांची नावे पुढील प्रमाणे रिजवान शेख वय 15, अस्मा बेगम वय १७, अरहान शेख वय18, फातिमा शेख वय 38, नसो शेख वय 18, तशो शेख वय 20, दूशहरा शेख वय 25, महक शेख वय 40, शेख शाहिद वय 30, जरीना बेगम वय 35, नूरजहाँ बेगम वय 50, युसुफ खान वय 28, युनूस खान वय 32, सुनील तिरुमले वय 35, कमलबाई वय 57. समीरा बाग येथील रेस्क्यू केलेला लोकांची नावे पुढीलप्रमाणे प्सरी बेगम वय 50,शेख बाबू वय 65,शेख ऐशा वय 08, शरिफा शेहदा वय 40, मोहम्मद जाफर वय 50, शेख गौस वय 33 अशी आहेत.




