नवीन नांदेड l नांदेड तालुक्यातील तुप्पा मंडळ अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महास्वराजय अभियान मध्ये स्वताहून केलेले कार्य हे अभिनंदनीय असुन आपत्ती काळात ही पोलीस पाटील यांच्ये सहकार्य आवश्यक असल्याचे प्रतिपादन उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.सचिन खल्लाळ यांनी सत्कार प्रसंगी केले यावेळी पोलीस पाटील यांनी या शिबिरात सहभाग नोंदविला बदल अभिनंदन केले.


नांदेड तालुक्यातील तुप्पा मंडळ अंतर्गत असलेल्या आठ गावातील पोलीस पाटील यांच्या वतीने गोपाळचवाडी येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महास्वराजय अभियान अंतर्गत विविध योजना शिबीर प्रसंगी सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते.


यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ सचिन खल्लाळ,नांदेड तहसीलदार संजय वारकड, पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार रवींद्र राठोड, मंडळ अधिकारी हेमंत सुजलेगावकर, ग्राम महसूल अधिकारी कविता इंगळे, यांच्या सह गोपाळ चावडी ग्रामपंचायत सरपंच प्रतिनिधी प्रदीप लाखे, ऊपसरपंच साहेबराव सेलुकर व मान्यवरांच्या सत्कार करण्यात आला.


यावेळी पोलीस पाटील यांनी या शिबीराचा माध्यमातून स्वताहुन उपस्थित राहुन ग्रामस्थ यांना विविध योजना संदर्भात माहिती देऊन उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते.तुप्पा मंडळ अंतर्गत राहेगाव भायेगाव,किक्की,वडगाव,तुप्पा,फतेहपुर ,कांकाडी, बाभुळगाव ,हेमला तांडा येथील पोलीस पाटील प्रतिनिधी श्रध्दा विजय कुमार खटके, सौ.जयश्री संजय पाटील इंगळे,आशा मोतीराम संगेकर ,आदर्श पोलीस पाटील सुमन शिवानंद खोसडे, गोविंद दामु तेलंगे, सिध्देश्वर पुयड,आंनद शंकर पवार, वसंत पल्लेवाड, पोलीस पाटील प्रतिनिधी विजयकुमार खटके,संजय पाटील इंगळे,शिवानंद खोसडे,शंकर कोल्हे,सरपंच मारोतराव संगेकर यांच्या सह ग्रामस्थ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



