Sarpanch Patil of Yergi participated in the meeting in Mumbai regarding the 16th Finance Commission देगलूर,गंगाधर मठवाले। सह्याद्री अतिथी गृह मुंबई येथे १६ व्या वित्तआयोगाच्या अनुषंगाने ग्रामपंचायत विकासासाठी महत्वपूर्ण विषयावर बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये या वित्त आयोगाच्या उपाययोजन व विकास या संदर्भात मार्गदर्शक सूचना मागवण्याच्या समितीमध्ये देगलूर तालुक्यातील येरगी चे सरपंच प्रतिनिधी संतोष पाटील यांना निमंत्रित करण्यात आले होते.


सदरील बैठकीत प्रधान सचिव एकनाथ डवळे, १६ व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. अरविंद पनगढ़िया यांचे सर्वप्रथम स्वागत करण्यात आले. यावेळी विविध मागण्याचे निवेदन सुपूर्द करण्यात आले. या प्रसंगी १६ व्या वित्त आयोगाच्या अनुषंगाने पूर्व तयारी संदर्भात बैठक आयोजित केली होती.


या प्रसंगी वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे धुळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवडे, पद्मभूषण पुरस्काराचे मानकरी आदर्श सरपंच पोपटराव पवार, आर्दश सरपंच दादासाहेब काळे, अमोल भुजबळ, सरपंच प्रतिनिधी संतोष पाटील येरगीकर, मनिष फुके, अर्चना सावंत, जयश्री इंगोले, सिंधु तायडे, तेजराम चव्हाण, श्रद्धा जायधने, डॉ कविता वारे, सुधीर गोसमारे, प्रल्हाद वाघमारे,भाऊसाहेब ढिकले, रणशिंग पाटील, तानाजी लांडगे, महेश आगे, सुनिल ठाकरे, व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


या बैठकीत समितीमधील सदस्यांना ग्रामपंचायत बळकट करण्यासाठी आणि त्या माध्यमातून ग्रामीण क्षेत्राचा विकास साधण्यासाठी विविध उपाययोजनांची चर्चा करण्यात आली.



