भाद्रपद शुद्ध तृतीयेला म्हणजे गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी येणार्या हरितालिका या सणाच्या दिवशी स्त्रिया आणि कुमारिका व्रतस्थ राहतात. हे व्रत करण्यामागील शास्त्र आणि या व्रताचे महत्त्व या लेखातून थोडक्यात जाणून घेऊया.


1. इतिहास आणि उद्देश – पार्वतीने हे व्रत करून शिवाला प्राप्त करून घेतले; म्हणून मनासारखा वर मिळण्यासाठी, तसेच अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया हे व्रत करतात.


2. व्रत करण्याची पद्धत – प्रातःकाळी मंगलस्नान करून पार्वती आणि तिची सखी यांच्या मूर्ती आणून त्या शिवलिंगासह पूजल्या जातात. रात्री जागरण करतात. दुसर्या दिवशी सकाळी उत्तरपूजा करून लिंग आणि मूर्ती विसर्जित करतात. हरितालिकेच्या पूजनाच्या वेळी 16 शक्तीस्वरूप नाममंत्रांचे पठण करत 16 पत्री शिवपिंडीवर वाहतात, त्यामुळे शिवपिंडीत शिवस्वरूप शक्तीचा प्रवाह आकृष्ट होतो. पत्रीपूजनातून अधिक प्रमाणात शक्तीची स्पंदने निर्माण होतात.


संदर्भ : सनातन संस्थेचा ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’, संपर्क क्र. : 9284027180



