Dr. Sharda Chondekar Tehsildar Kinwat felicitated किनवट, परमेश्वर पेशवे| केंद्र शासनाच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाद्वारे गुरुग्राम, हरियाणा येथे उच्चस्तरीय Intensive Orientation programme मध्ये भाग घेण्यासाठी भारतातील केवळ 32 अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले आहे. त्यामध्ये किनवटच्या तहसिलदार डॉ शारदा चोंडेकर यांची निवड करण्यात आली आहे.


डॉ शारदा चोंडेकर, तहसिलदार या केंद्रशासनाच्या Recognized Trainer आहेत. त्यांना केंद्र शासनातर्फे उच्चस्तारीय प्रशिक्षणासाठी प्रशिक्षक म्हणून विविध राज्यात बोलावण्यात येते. आतापर्यंत त्यांना नवी दिल्ली,केरळ,तेलंगणा, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, कर्नाटक इ राज्यात आमंत्रित करण्यात आले असून त्यांनी केंद्र व राज्य शासनाच्या विविध वरिष्ठ अधिकऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे.


सद्यस्थितीत कार्मिक व प्रशिक्षण विभागाच्या समन्वयाने क्षमता बांधणी आयोग व मिशन कर्मयोगी द्वारे भारतीय प्रशासनात आमूलाग्र बदल घडत आहे. मिशन कर्मयोगी मार्फत देशातील नागरी सेवकांना एआय-सक्षम शिक्षण साधने, नेतृत्व कौशल्ये आणि बहुआयामी कौशल्यांनी सक्षम करून अधिक आधुनिक, सक्षम आणि सुसज्ज बनवते, ज्यामुळे भविष्यासाठी कार्यतत्पर प्रशासनाची पायाभरणी केली जात आहे.


त्याचाच एक भाग म्हणून डॉ शारदा चोंडेकर यांना या महत्वाच्या कार्यशाळेत सहभाग घेण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. डॉ शारदा चोंडेकर यांना केंद्र शासनाद्वारे प्रशस्तीपत्र देण्यात आले असून, सत्कार करण्यात आला आहे, त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.



