नांदेड| सन 2023 24 व 2024 25 या राजश्री शाहू महाराज वृद्ध कलावंत मानधन योजनेचे रखडलेले 2 वर्षाचे 200 प्रस्ताव कमिटी स्थापन करून लवकरात लवकर आचारसंहितेच्या अगोदर मंजूर करण्यात यावे या आशयाचे निवेदन विलास बोडगे, श्रीकांत शिंदे शिवाजी चीतरवार यांनी नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुलजी सावे यांना दिले आहे.


नांदेड जिल्ह्यातील वयोवृद्ध कलावंतांना महाराष्ट्र शासनाकडून मिळणाऱ्या राजश्री शाहू महाराज व कलावंत मानधन योजनेसाठी यापूर्वीचे कलावंत निवड समिती नांदेड यांनी उपमुख्य कार्यकारी साहेब व सचिव साहेब यांनी मागील सन 2023 24 व 2024 25 पासून दोन वर्षाचे 200 प्रस्ताव कमिटीकडे (पंचायत विभाग जिल्हा परिषद नांदेड) मध्ये प्राप्त झालेले आहेत व ते अद्याप पर्यंत मंजूर करण्यात आलेले नाहीत.सदरील प्रस्ताव आज रोजी तसेच पडून आहेत.


तेव्हा आपण याकडे लक्ष देऊन आपल्या स्तरावरील प्रस्ताव कमिटी स्थापन करून पालकमंत्री महोदय यांनी राजश्री शाहू महाराज साहित्यिक व कलावंत मानधन निवड समिती लवकरात लवकर स्थापन करून प्रलंबित असलेले प्रस्ताव निकाली काढण्यासाठी नांदेड जिल्हा राजश्री शाहू महाराज साहित्यिक व कलावंत मानधन निवड समिती अशासकीय सदस्यांची लवकरात लवकर निवड करून प्रलंबित प्रस्ताव मार्गे लावावे अशी मागणी या निवेदनात नमूद केली आहे.


बहुजन टायगर युवा फोर्स चे अध्यक्ष तथा पारंपरिक शाहीर लोककला मंडळाचे संस्थापक अध्यक्ष त्रिरत्नकुमार भवरे यांनी 2023 व 2024 ची ऑफलाईन प्रक्रिया होती तीच निवड समितीच्या मंडळाने घ्यावी. जेणेकरून 2023-24 च्या लाभार्थ्यांवर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी.अशी माहिती आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे. 17 फेब्रुवारी पर्यंत ही प्रक्रिया झाली नाही तर कधीही जिल्हाधिकारी परिषद कार्यालय समोर भजन आंदोलन करणार असल्याची माहिती शाहीर बळीराम जाधव सुजलेगावकर यांनी दिली आहे.



