नांदेड l मार्क्सवादी आणि आंबेडकरवादी चवळीतील लढाऊ कार्यकर्ते कॉ.गंगाधर गायकवाड यांना नुकतेच कामगार चळवळीतील बहुजन रत्न पुरस्काराने सन्मानित केले आहे.


महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंती निमित्ताने अखिल भारतीय आंबेडकर महासभा जि.नांदेड च्या वतीने ३० नोव्हेंबर रोजी पीपल्स कॉलेज येथील नरहर कुरुंदकर सभागृहात पुरस्कार प्रदान कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले होते.
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या इतरही मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.


कॉ.गंगाधर गायकवाड हे सेंटर ऑफ इंडियन ट्रेड यूनियन्स (सीटू) कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी तथा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव मंडळ सदस्य व नांदेड तालुका कमिटीचे सचिव आहेत. त्यांनी दलित-आदिवासी व अल्प संख्याकावर झालेल्या अन्याया विरुद्ध वेळोवेळी आवाज उठवून पीडितांना न्याय देण्याचे काम केल्याचे अनेक उदाहरणे आहेत.


ते राष्ट्रीय इंग्रजी वृतपत्र द हिंदू चे चांगला प्रेस मिळविलेले नोंदीत कार्यकर्ते असून त्यांनी अनेक घोटाळे उघडकीस आणले आहेत. त्यांना चळवळीतील पॅन्थर म्हणून ओळखले जाते.
यापूर्वी त्यांना श्रम सेवा,समर गौरव,समाज घडवीणारे धुरंदर, चळवळीतील पँथर,कॉ. अण्णा भाऊ साठे,सामाजिक कार्य, ख्रिश्चन अल्प संख्यांक सेवाभावी संस्थेचा पुरस्कार, राष्ट्रीय कलाल, गौड समाज युवा संघर्ष समितीचा राज्यस्तरीय पुरस्कार,जिल्हाधिकारी नांदेड यांच्या हस्ते कोरोना योद्धा पुरस्कार असे अनेक पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.

कामगार चळवळीतील बहुजन रत्न पुरस्कार सोहळ्यात त्यांना उपस्थित राहता आले नसल्याने डीवायएफआय चे तालुका उपाध्यक्ष कॉ.सुभाषचंद्र गजभारे यांनी तो स्वीकारला आहे.
महाकवी वामनदादा कर्डक जयंती महोत्सव समिती या कार्यक्रमाचे अध्यक्ष साहित्यिक राज गोडबोले, उदघाटक जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व्यंकटराव दूधंबे, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. अशोक ढोले, ऍड. भीमराव हाटकर, धंनजय बेलोकर, भीमशाहीर ललकार बाबू आदींची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा पत्रकार श्रावण नरवाडे, युवा जिल्हाध्यक्ष दिपक साळवे यांनी परिश्रम घेतले.
कॉ.गंगाधर गायकवाड यांना उपरोक्त पुरस्कार देऊन सन्मानित केल्यामुळे सीटू जिल्हा कमिटीच्या वतीने आयोजकांचे आभार मानले असून कॉ.गायकवाड यांना सदिच्छा देण्यात येत आहेत.


