नवीन नांदेड l श्री सेवादास शिक्षण प्रसारक मंडळाचे जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय व संशोधन केंद्र सिडको, नवीन नांदेडच्या वतीने आयोजित केलेल्या बीएसडब्ल्यू प्रथम वर्ष व एम.एस.डब्ल्यू. प्रथम वर्षाच्या नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून उद्बोधन करताना डॉ. कर्मयोगी नानासाहेब जाधव यांनी केले.


प्रमुख उपस्थितीत सौ.शांतादेवी जाधव संस्थेच्या उपाध्यक्ष ह्या होत्या. तसेच कर्मयोगी डॉ. नानासाहेब जाधव पुढे म्हणाले की समाजकार्य हा अभ्यासक्रम जगाच्या पाठीवर सर्वत्र आहे. समाजकार्य पदवीचे विद्यार्थी समाजाला जोडण्याचे काम करतात. आपण ग्रामीण भागातील जीवन शैलीचा अभ्यास करावा. जगातील देशाचा अभ्यास करून आपण आपल्या देशासाठी काय करू शकतो याचा विचार समाज कार्याच्या विद्यार्थ्यांनी करावा.


भारतासारखे जीवन जगामध्ये समाधानकारक कुठेही नाही, महाविद्यालयाच्या ग्रंथालयात हजारो पुस्तके आहेत याचा उपयोग विद्यार्थ्यांनी आपल्या विकासासाठी करावा. विद्यार्थ्यांनी गुणवत्ता प्राप्त केल्यास नोकरी त्यांच्याकडे धावून येते. जीवन हे वारंवार येणारे नाही त्याचे आपण सोने करावे. तुमचे जीवन,अभ्यास करून उज्वल करा. असा संदेश दिला.


यानंतर प्रमुख उपस्थितीत असलेले प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार यांनी विद्यार्थ्यांना संबोधताना म्हणाले की, ही भूमी संतांची आहे. संतांनी समाज कार्य केले आहे. ते आज लोक पावत आहे. कठोर परिश्रमातून डॉ. नानासाहेब जाधव यांनी समाजकार्य महाविद्यालय नांदेड येथे सुरू केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एन.जी. पाटील यांनी मांडले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा .गोपाल बडगिरे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ.सत्वशीला वरघंटे यांनी मांडले या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ मेघराज कपूर डेरिया, डॉ मनीषा मांजरमकर, डॉ.दिलीप काठोडे, डॉ विद्याधर रेड्डी,डॉ.प्रतिभा लोखंडे, ग्रंथपाल सुनील राठोड, डॉ. शेख असिफुद्दीन, डॉ. शिवाजी शिंदे, डॉ.अंबादास कर्डिले,प्रा.सुनील गोईनवाड,राजेश पाळेकर,संतोष मोरे,सुनील कंधारकर,नरेंद्र राठोड, श्री गणेश तेलंग,राजू केंद्रे, यांनी परिश्रम घेतले.


