नविन नांदेड। बळीरामपुर गावाच्या विकासासाठी पक्ष,गट तट ,भेदभाव न करता पाणीपुरवठा व ईतर योजनेसाठी एकत्र येऊन गावाचा विकास साठी एकत्र येऊन नवनिर्वाचित अपक्ष संरपचासह सदस्यांनी एकत्र येऊन सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य तथा नांदेड तालुका काँग्रेस कमिटीच्ये अध्यक्ष मनोहर पाटील शिंदे यांनी बळीरामपुर ग्रामपंचायत नवनिर्वाचित संरपच व सदस्य यांच्या सत्कार सोहळया प्रसंगी केले.

जिल्हा परिषद सदस्य तथा नांदेड तालुका काँग्रेस कमिटीच्ये तालुका अध्यक्ष मनोहर पाटील शिंदे व धनेगाव ग्रामपंचायत यांच्या वतीने बळीरामपुर ग्रामपंचायत नवनिर्वाचित संरपच व ग्रामपंचायत सदस्या यांच्या सत्कार शिंदे यांच्या निवासस्थानी २२ डिसेंबर रोजी शाल श्रीफळ देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.

यावेळी माजी पंचायत समिती सदस्य तथा जेष्ठ ग्रामपंचायत सदस्य भुंजगराव भालके,संरपच पिटुं पाटील शिंदे, माजी संरपच दिलीप गजभारे, ऊपसंरपच डॉ.पुजाताई शिंदे, यांच्या सह मान्यवरांच्यी उपस्थिती होती. यावेळी नवनिर्वाचित थेट जनतेतुन अपक्ष संरपच सौ.रेणुका इंद्रजित पांचाळ सदस्य भारतबाई दासरवाड,पुजाताई चौदंते,अनिता ताई तेलंग, शांताबाई फुले, नरसिंग गडपवार,नागेश वाघमारे,शेख जाकीर खाजा, किशन गव्हाणे, वैशाली आढाव,यांच्या सह ऊपसिथीत सदस्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी शिंदे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून धनेगाव बळीरामपुर ग्रामपंचायत मध्ये आम्ही एकत्र असुन पाणी पुरवठा दोन्ही ग्रामपंचायतने समन्वयाने सोडला असुन तो समन्वय कायम ठेवुन नवनिर्वाचित संरपच व सदस्यांनी गावाच्या विकासासाठी नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महादेवराव हंबर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संग्राम निलपत्रेवार यांनी केले.यावेळी बळीरामपुर चे माजी सरपंच अमोल गोडबोले, धनेगाव ग्रामपंचायत सदस्य तातेराव ढवळे, शिवाजी बुचडे,शेख फारूक, रमेश वाघमारे, माधवराव जंगमे, अब्दुल गफार अब्दुल खादर, माधवराव देशमुख व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शेख मुख्तार, व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.