नांदेड| सत्यशोधक विचार मंच व मानव विकास सेवाभावी संशोधन संस्था नांदेडच्या वतीने आज शहरात 20 व्या आंबेडकरवादी साहित्य संमेलनाचे आयोजन येथील डॉ. शंकरराव चव्हाण सभागृहात करण्यात आले आसून संमेलनाध्यक्ष प्रख्यात विचारवंत डॉ. सुरज एंगडे (अमेरिका), उद्घाटक सुप्रसिद्ध साहित्यीक तथा महा.राज्य साहित्यिक अर्जून डांगळे (मुंबई), प्रा.महेंद्र भवरे (मुंबई), कवी यशवंत मकरंद (परभणी), आदी मान्यवर शहरात दाखल झाले असल्याची माहिती स्वागताध्यक्ष मंगेश कदम, निमंत्रक विठ्ठल पाटील डक, संयोजन समितीचे अध्यक्ष सुरेश हाटकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

पहिल्या सत्रात संमेलनाचे उद्घाटन 12.30 वाजता सुप्रसिद्ध साहित्यिक विलास सिंदगीकर यांचे हस्ते होणार असून ज्येष्ठ साहित्यिक प्रा. दत्ता भगत, माजी महापौर जयश्री पावडे, सिद्धार्थ हत्तीअंबीरे (परभणी), धनंजय गुडसुरकर (लातूर) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. विविध क्षेत्रात भरिव कार्य करणार्या मान्यवरांचा राष्ट्रभूषण व समाजभूषण पुरस्काराने गौरव याच सत्रात होणार आहे. सुप्रसिद्ध कवी यशवंत मकरंद (परभणी) यांच्या अध्यक्षतेखाली विद्रोही कवी संमेलन दुसर्या सत्रात दुपारी 4.00 वाजता होणार असून ज्येष्ठ कवी प्रा. रविचंद्र हडसनकर, प्रा. जगदीश कदम यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या सत्राचे बहारदार सुत्र संचलनाची धूरा कवी ऍड. भिमराव हाटकर सांभाळणार आहे.

सायं. 5.30 वा. आंबेडकरोतर साहित्य चळवळ या महत्वपूर्ण विषयांवर विवेचन प्रा. महेंद्र भवरे (मुंबई) करतील.समारोपीय सत्र सायं.6 वा. संमेलनाध्यक्ष डॉ.सुरज एंगडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत अर्जून डांगळे (मुंबई), यांचे प्रमुख भाषण होणार आहे. ठराव वाचन, पुरस्कार वितरण आदी होणार आहे. रात्री 7.00 वाजता आंबेडकरी गीतांचा जलसा साद होणार असून महाराष्ट्राच्या सुविख्यात गायीका मुंजूषाताई शिंदे व संच यांचा दणदणीत कार्यक्रम सादर होणार आहे. या संमेलानास आंबेडकरवादी साहित्यीक, बुद्धीजीवी, चळवळीतील कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सत्यशोधक विचार मंचचे अध्यक्ष कोंडदेव हाटकर, सचिव श्रावण नरवाडे, मानव विकास सेवाभावी संशोधन संस्थेचे अध्यक्ष राज गोडबोले, संयोजन समितीचे उपाध्यक्ष ऍड धम्मपाल कदम, सचिव एन.टी. पंडित, कार्याध्यक्ष सुभाष सुर्यतळ, नईम खान, आर.पी. कोकलेगांवकर, डॉ. राम वनंजे, यांनी केले आहे.
